एका कोपर्यात बंद करून लक्षातही येऊ द्यायचे नाही असेल जीथे
त्या कोपर्यात पुन्हा
फिरकायचेही नाही
फिरकलो तरीही हसत हसत
तोंड फिरवून, पुन्हा मागे वळून पहायचे नाही
बरेचदा जाणवतात
या गोष्टी सर्वांना मनात
विसरायला लागतात त्या
दुसऱ्यांसाठी क्षणात
म्हटलंच आहे कुणी
आहे हे आयुष्य एक रंगमंच
कधी हसून कधी रडून
चालतच राहते हे प्रपंच
चालतच राहते हे
मनातल्या मनात बधले जाणे
कुणालाही ऐकायचे नसते
तुमच्या आयुष्याचे हे तराणे
आयुष्याच्या सहलीत
साथ तुम्हाला तुमचीच
स्वतःला साथ द्यायला
साथ लागते मनाचीच
म्हणून त्या मनालाच
जपावे लागते
मनातल्या मनात कुडत राहणे
सोडावे लागते
त्याला जरा मोकळे
सोडून पहावे लागते
आशेचा तो एक किरण दिसला
की अखेरच्या भरारी साठी सोडावे लागते...!
cheers to you, cheers to life..!
Hey nice lines...
ReplyDeleteDid u wrote it on ur own?
Yup..those are my words..
ReplyDeleteAwesome lines!
ReplyDeleteI'm impressed with sixth stanza
"आयुष्याच्या सहलीत साथ तुम्हाला तुमचीच
स्वतःला साथ द्यायला साथ लागते मनाचीच"
hmmm...thnx..
ReplyDelete