पण असतात खऱ्या त्या
हव्याहव्याशा वाटत असतात
पण मिळत नाहीत परत त्या
झोकून द्यावेसे वाटते तेव्हा
चिंता नको कसली
मनातले सारे उघडून द्यावे
आनंदाने बेभान, घेऊ भरारी
सुवास तो तसाच राहावा
तसाच असावा तो ओलावा
त्यांचाच मुळे जगतो आपण
नकळत मनाला करतात मोकळा
सुखाचे सोबती असतात त्या
दुखातही साथ देतात
रडव्या मनाला कधी कधी
खुदकन हसवून जातात
आपल्या मनात घर करत
जन्मभराचे साथीदार बनतात
प्रत्येक क्षणी मैत्रीच्या रुपाने
ह्यांना गोड आठवणी असे म्हणतात
cheers to you, cheers to lyf...!
No comments:
Post a Comment